Type Here to Get Search Results !

गणेशोत्सवासाठी मुंबई पोलीस सज्ज

मुंबई - शहरात गणेशोत्सव सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. उत्सवाच्या काळात कोणताही  अनुचित प्रकार म्हणून मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. 

गणेशोत्सवाच्या काळात गणेशोत्सवाच्या काळात शहरात कोणताही अनुचित घटना घडू नये म्हणून प्रत्येक मंडळाच्या निवडक कार्यकर्त्यांच्या बैठका पोलीस ठाण्यातील अधिकारी घेत आहेत. गणेशोत्सवाच्या काळात कोणती दक्षता व खबरदारी घ्यावी, याचे मार्गदर्शन पोलीस अधिकारी या कार्यकर्त्यांना करत आहेत. निवडक कार्यकर्त्यांना काही अधिकाऱ्यांचे मोबाइल क्रमांक देण्यात आले असून, या काळात त्यांच्याशी समन्वय साधण्यास सांगण्यात आले आहे. मंडपात प्रवेश व बाहेर जाण्यामार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात सांगण्यात आले असून, संशयितांवर कडक नजर ठेवण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवादरम्यान पोलिसांच्या सुट्ट्या बंद करण्यात आल्या असून सुमारे ३५ हजार शिपाई व २० हजार अधिकाऱ्यांची बंदोबस्ताच्या कामे नियुक्ती करण्यात आली आहे. सीसीटीव्ही कॅमेरा मुख्य नियंत्रण कक्षातून पोलीस संपूर्ण शहरात लक्ष ठेवणार असून, यासाठी मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
Tags

Top Post Ad

Below Post Ad