Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

डॉ. आंबेडकरांचा ३६० फुटाचा पुतळा उभारावा अन्यथा आंदोलन - आनंदराज


मुंबई - इंदू मिलमधील स्मारकाबाबात सरकारकडून आंबेडकरी जनतेची दिशाभूल केली जात आहे. ही दिशाभूल त्वरित थांबवून सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे प्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ३६० फुटांचा पुतळा उभारावा. अन्यथा आंबेडकरी जनतेला सरकारविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशारा रिपब्लीकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी दिला आहे.

इंदू मिलचा भूखंड डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाला देण्यात यावा या मागणीसाठी आंबेडकरी जनतेकडून मिलचा ताबा घेण्यात आला होता. त्यावेळी भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्त्यांची स्थापना करण्यात आली होती. इंदू मिलमध्ये सुरु असलेल्या आंबेडकर स्मारकाच्या कामा दरम्यान या ठिकाणी असलेल्या भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्त्यांची सुरक्षित स्थळी स्थापना करण्यात आली. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी आनंदराज आंबेडकर यांनी इंदू मिलचे आंदोलन व त्यानंतर झालेल्या घडामोडींची माहिती उपस्थितांना दिली. त्यांनी राज्य सरकार आणि एमएमआरडीएने बनवलेल्या स्मारकाच्या डिझाईनबाबत नाराजी व्यक्त केली. निधी वाढला मात्र मात्र पुतळ्याची उंची कमी झाली. सरकारने 360 फुटाचा पुतळा उभारण्याचे आश्वासन दिले मात्र प्रत्यक्ष चौथरा 100 फूट व पुतळा 250 फूट ही म्हणजे आंबेडकरी जनतेची फसवणूक असल्याचे त्यांनी सांगितले. अजून वेळ आहे आता शौरपायलिंगचे काम सुरू झाले आहे. पुतळ्याची उंची 360 फूट करा अन्यथा पुन्हा आंबेडकरी जनतेला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा आनंदराज यांनी सरकारला दिला.

या प्रसंगी आनंदराज आंबेडकर यांच्या पत्नी मनिषा आंबेडकर, मुंबई प्रदेश अध्यक्ष कामगार नेते रमेश जाधव, भिकाजी कांबळे, लक्ष्मण भगत, पांडूरंग साळवी, अशोक कांबळे, अंकुश सकपाळ, मनोहर जाधव, यशवंत कदम, एच. आर. पवार, प्रकाश बनकर, लवेश लोखंडे, भाई सोनावणे, भीमराज जगताप, अरुणा राव, संदीप बनकर, सन्नी हिरे, विजय देठे, राकेश गायकवाड, गणेश गायकवाड, चंद्रकांत शिंदे , हर्ष जाधव, रि. वि. सेनेचे आशिष गाडे आधी कार्यकर्ते उपस्थित होते 

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom