चित्रपट निर्मात्यांनी काश्मिरी संस्कृती, निसर्ग सौंदर्यावर लक्ष द्यावे - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

15 September 2018

चित्रपट निर्मात्यांनी काश्मिरी संस्कृती, निसर्ग सौंदर्यावर लक्ष द्यावे

काश्मीर गेली कित्येक वर्षे धुमसत आहे. जागोजागी रक्ताचे पाट वाहिले जात आहेत. काश्मीरच्या या भळभळत्या जखमेमागचे मुख्य कारण आहे, राजकीय स्वार्थ. अभिनेता जॉन अब्राहमने याच भावना काहीशा सौम्य शब्दात व्यक्त केल्या. काश्मीरचा विषय हाताळताना चित्रपट निर्मात्यांनी तेथील राजकारणावर भर न देता काश्मिरी संस्कृती आणि तेथील निसर्ग सौंदर्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे जॉन म्हणाला. 

जॉन सध्या आपल्या आगामी 'रोमियो अकबर वॉल्टर' (रॉ) या चित्रपटाच्या शूटिंगसाठी काश्मीरच्या उत्तरेकडील बारामुल्ला जिल्ह्यात आला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत जॅकी श्रॉफही काम करत आहे. याप्रसंगी जॉन म्हणाला की, 'काश्मीर पृथ्वीवरील सर्वात सुंदर स्थळांपैकी एक आहे. मी काश्मीरबाबत बरेच काही वाचले आहे. काश्मीरचा १९४७ सालापासूनचा इतिहास मला माहीत आहे. येथील परिस्थितीची मला चांगली जाण आहे. काश्मीरबाबत जे काही राजकारण चालले आहे, तेही मला माहीत आहे; पण मी म्हणेन चित्रपट निर्मात्यांनी काश्मीरबाबत नेहमीच नकारात्मक दाखवू नये. काश्मिरी संस्कृती येथील निसर्गसौंदर्य यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे,' असेही जॉन म्हणाला. 

Post Top Ad

test
test