Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

म्हाडा कोंकण मंडळाचे पात्रता तपासणी शिबिर यशस्वी

मुंबई - म्हाडाच्या कोंकण मंडळातर्फे सदनिका सोडतीनंतर राबविण्यात आलेले अनोखे पात्रता तपासणी शिबिर यशस्वी झाले असून सदर शिबिरात अवघ्या दहा दिवसात १३०७ अर्जदारांना तात्पुरते देकार पत्र देण्यात आले व सुमारे २३०० यशस्वी अर्जदारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली, अशी माहिती कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी विजय लहाने यांनी आज दिली.  

कोंकण मंडळातर्फे वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात ९०१८ सदनिकांसाठी दि. २५ ऑगस्ट रोजी संगणकीय सोडत काढल्यानंतरसंकेत क्रमांक २७०, २७१, २७२ व २७५ मधील यशस्वी अर्जदारांसाठी या पात्रता तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरासाठी जे यशस्वी अर्जदार उपस्थित राहू शकले नाहीत त्यांच्याकरीता दि. १० सप्टेंबर २०१८ पासून म्हाडा मुख्यालयातील कोंकण मंडळाच्या पणन कक्षामध्ये पात्रता तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीरांतर्गत दररोज ५० यशस्वी अर्जदारांची पात्रता तपासण्यात येईल. यासाठी मंडळाने टोकन पद्धत अवलंबिली असून इच्छूक यशस्वी अर्जदारांकरीता म्हाडाच्या मित्र कक्षामधील कोंकण मंडळाच्या संबंधित कर्मचाऱ्यांकडे टोकन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सोडतीतील उर्वरित संकेत क्रमांकांमधील अर्जदारांच्या पात्रता निश्चितीसाठी दुसऱ्या टप्प्यातील शिबीर लवकरच आयोजित करण्यात येईल, असे लहाने यांनी सांगितले. 

या शिबिराच्या माध्यमातून अर्जदार ते प्राधिकृत अधिकारी यांच्यामध्ये थेट संवाद साधण्यात यश मिळाले. एकूण प्रकरणांपैकी फक्त ३ टक्के प्रकरणातील अर्जदार अपात्र ठरले असून अपात्रतेची कारणे अर्जदाराला थेट तेथेच पटवून देण्यात आल्यामुळे एकही अपील दाखल झालेले नाही. या शिबिरात मुंबई-ठाणे बाहेरील अर्जदारांना प्राधान्य देऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. अपंग, ज्येष्ठ नागरिक , गर्भवती महिला यांना पात्रता तपासणीसाठी प्रथम प्राधान्य देण्यात येऊन त्यांची कागदपत्रांची छाननी तत्परतेने करण्यात आली हे या शिबिराचे वैशिष्ट्य असल्याचे लहाने यांनी सांगितले.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom