५ नोव्हेंबरपासून पृथ्वी फेस्टीव्हलला सुरुवात - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

29 September 2018

५ नोव्हेंबरपासून पृथ्वी फेस्टीव्हलला सुरुवात


मुंबई - पृथ्वी थिएटरच्या ४० वर्षपूर्ती निमित्त ५ नोव्हेंबरपासून पृथ्वी फेस्टीव्हलला सुरुवात होणार आहे. हा महोत्सव ३ नोव्हेंबर २०१८ रोजी रॉयल आपेरा हाऊसमध्ये सुरू होईल. त्यानंतर ५ ते १२ नोव्हेंबर २०१८ दरम्यान पृथ्वी थिएटरमध्ये विविध नाट्यप्रयोग रंगतील.

पृथ्वी थिएटरतर्फे त्यांची ४० वी वर्षपूर्ती तीन थिएटर्समधील -पृथ्वी थिएटर, रॉयल ऑपेरा हाऊस आणि जी५ए येथील - परफॉर्मन्सच्या महोत्सवाने साजरी केली जाणार आहेत. पृथ्वीराज कपूर यांच्या वाढदिवशी त्यांचे 'दीवार' हे नाटक रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये पुन्हा एकदा सादर केले जाणार आहे. हे नाटक पहिल्यांदा याच नाट्यगृहात सादर झाले होते. ५ नोव्हेंबर १९७८ रोजी पृथ्वी थिएटरमधील रंगभूमीने आपले पहिले नाटक पाहिले... ते होते ओम पुरी आणि नसीरुद्दीन शाह यांच्या अभिनयाने नटलेले मज्मा यांचे 'उद्ध्वस्त धर्मशाला'.

आता, ५ नोव्हेंबर २०१८ रोजी पृथ्वी थिएटरमध्ये पृथ्वी फेस्टीव्हलला सुरुवात होणार आहे. नसरुद्दीन शहा अभिनित मोटले यांच्या 'द ट्रूथ' या नाटकाने. नेहमीप्रमाणेच पृथ्वी थिएटर आपल्या प्रेक्षकांना संस्मरणीय अनुभव देण्याचा प्रयत्न करत आहे. यंदाच्या महोत्सवात प्रेक्षक गतकाळातील वैभवाच्या आठवणींसोबत काहीशा आधुनिक, समकालीनतेची जोड दिलेला नाट्यानुभव घेऊ शकतील. महोत्सवाचा हा प्रवास पुढे जाऊन शेवटच्या दिवशी एनसीपीएच्या एसओआयतर्फे पृथ्वी थिएटरमध्ये सादर होणाऱ्या ग्रँड फिनालेपर्यंतचा असेल.

Post Top Ad

test
test