वडाळा आरटीओची रिक्षाचालकांवर कारवाई

Anonymous

मुंबई - रिक्षाचालक अनेकदा भाडे नाकारतात, जादा भाडे आकारतात किंवा प्रवाशांशी उद्धट वर्तन करतात. अशा रिक्षाचालकांविरुद्ध प्रवासी आरटीओ कार्यालयात तक्रार नोंदवतात, अशा तक्रारींच्या आधारे आरटीओतर्फे रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात येते. वडाळा आरटीओने १ ते ३१ ऑगस्टदरम्यान अशाच रिक्षाचालकांवर कारवाई केलेली आहे. या कारवाईत ५२ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शिवाय २४ जणांची अनुज्ञप्ती, तर २४ जणांचा परवाना निलंबित करण्यात आलेला आहे. वडाळा आरटीओकडे ऑगस्ट महिन्यात रिक्षाचालकांच्या ६५ तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या. त्यापैकी २४ तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. आरटीओच्या वायुवेग पथकाने ही कारवाई केली आहे.
Tags