Type Here to Get Search Results !

भाडे नाकारणाऱ्या १३९४ रिक्षाचालकांवर कारवाई


मुंबई - अनेकदा रिक्षाचालक भाडे नाकारुन पुढे निघून जातात. त्यामुळे मुंबईकरांना रिक्षाची वाट पहात रस्त्यातच उभे राहावे लागते. जवळचे भाडे रिक्षाचालकांकडून नाकारले जाते. त्यासाठी विविध कारणे रिक्षाचालक सांगतात आणि निघून जातात. परिणामी, प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. अशा भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांवर आरटीओतर्फे कारवाई केली आहे. १ ते १० सप्टेंबरदरम्यान भाडे नाकारणाऱ्या, मीटर जलद करणे, उद्धट वागणूक, जास्त भाडे आकारणाऱ्या १३९४ रिक्षाचालकांवर कारवाई केली आहे. त्यातून ११ लाख ३६ हजारांचा दंडदेखील वसूल करण्यात आला आहे.

रिक्षाचालकांनी प्रवाशांना त्यांच्या इच्छितस्थळी पोहोचवणे बंधनकारक आहे. तरीदेखील रिक्षाचालक जवळचे भाडे नाकारताना सर्रास दिसतात. अनेकदा मीटरमध्ये फेरफार करून मीटर फास्ट केले जातात, तर कधी कधी जास्तीचे भाडे आकारले जाते. प्रवाशांशी उद्धटपणे वागले जाते. अशा रिक्षाचालकांवर आरटीओमार्फत कारवाई केली जाते. मुंबईत सुमारे १ लाख रिक्षा धावतात. एक रिक्षा तीन शिफ्टमध्ये चालवली जाते. रिक्षाचालकाने भाडे नाकारले किंवा जास्तीचे भाडे आकारले जाते. प्रवासी आरटीओकडे त्याची तक्रार दाखल करू शकतात. प्रवासी १८००२२०११० या टोल फ्री क्रमांकावर तक्रार दाखल करू शकतात. त्या तक्रारीच्या आधारे आरटीओ कारवाई करते. अंधेरी आरटीओने १ ते १० सप्टेंबरदरम्यान अशाच रिक्षाचालकांवर कारवाई केलेली आहे. यामध्ये भाडे नाकारणाऱ्या १४९, जास्तीचे भाडे आकारणाऱ्या १४२, मीटर फास्ट करणाऱ्या ७७, उद्धट वर्तन करणाऱ्या १०२६ अशा एकूण १३९४ जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. त्यांच्याक डून ११ लाख ३६ हजारांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. या शिवाय ६७ जणांचे लायसन्स, तर ८२ जणांचे परमीट निलंबित करण्यात आले आहे.

१ ते १० सप्टेंबर दरम्यानची आरटीओची कारवाई -
भाडे नाकारणे-१४९.
जास्तीचे भाडे आकारणे-१४२.
मीटर फास्ट करणे-७७.
उद्धट वर्तन -१०२६.
लायसन्स निलंबित-६७.
परमीट निलंबित-८२.
दंड - ११ लाख ३६ हजार रुपये.
Tags

Top Post Ad

Below Post Ad