एसआरएच्या नव्या मोबाइल ॲपचे आठवड्याभरात लाँचिंग - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

08 September 2018

एसआरएच्या नव्या मोबाइल ॲपचे आठवड्याभरात लाँचिंग


मुंबई - डिजिटलायझेशनचा स्वीकार करत अनेक प्रशासकीय संस्थांनी आपल्या नव्या संकेतस्थळासह मोबाइल ॲपही लाँच केले असून, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडूनही येत्या आठवड्याभरात नव्या मोबाइल ॲपचे लाँचिंग करण्यात येणार आहे. त्याबाबतचे ट्विट नुकतेच एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर यांनी केले आहे.

मुंबईसह उपनगरांमध्ये वाढत्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून सोडवण्यात येत आहे. २१ नोव्हेंबर २०१७ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झोपु प्राधिकरणाच्या नवीन संकेतस्थळाचा शुभारंभ करण्यात आला होता. त्याचवेळेस एसआरएच्या जीआयएस वेबपोर्टलचा शुभारंभ करण्यात आला होता. यामुळे झोपु योजनांची माहिती झोपडीधारकाला एका क्लिकवर उपलब्ध करण्यात आली होती. आता मात्र खऱ्या अर्थाने झोपु योजना स्मार्ट होणार आहे. त्यामुळे हे मोबाइल ॲपही एसआरएतील रहिवाशांसाठी उपयुक्त ठरणार आहे. हे मोबाइल ॲप बनवण्यासाठी ५ महिने अथक परिश्रम घेतले असून, वापरकर्त्यांच्या सोयीसुविधा लक्षात घेत अनेक अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध होणार असल्याचे दीपक कपूर यांनी ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे. सध्या एसआरएच्या संकेतस्थळावर जीआयएस प्रणालीचा वापर करण्यात आला असून, झोपडीधारकांना त्यांच्या झोपडीचा नकाशा व ठराविक माहिती उपलब्ध होणार आहे. यामुळे झोपु योजना जलदगतीने व पारदर्शक पद्धतीने राबवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Post Top Ad

test