Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

महाराष्ट्रातील औद्योगिक संस्थांना १० ‘राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कार’

नवी दिल्ली - औद्योगिक सुरक्षा, उत्तम पायाभूत सुविधा निर्माण करणाऱ्या महाराष्ट्रातील औद्योगिक संस्थांना 10 ‘राष्ट्रीय सुरक्षा पुरस्काराने’केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री (स्वतंत्र प्रभार) संतोष गंगवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. 

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या वतीने आज विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधत वर्ष 2016 चे ‘विश्वकर्मा राष्ट्रीय पुरस्कार’ आणि ‘राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कार’ प्रदानकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सचिव हरीलाल सावरिया, सहसचिव अनुराधा प्रसाद तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी विविध श्रेणीतील पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रातील औद्योगिक संस्थांना एकूण 10 राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

2.5 लाख श्रम तासांपेक्षा अधिक व 5 लाख श्रम तासांपर्यत काम करणाऱ्या औद्योगिक संस्थांच्या श्रेणीमध्ये पुणे येथील सणसवाडी भागातील कुपर स्टँडर्ड ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी विजेती ठरली. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील गोदरेज अँड बॉयस मॅन्युफॅक्चरींग कंपनी लिमीटेडही कपंनीही विजेती ठरली असून आज या संस्थांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अपघात मुक्त वर्षाच्या आधारावर 2.5 लाख श्रम तासांपेक्षा अधिक व 5 लाख श्रम तासांपर्यत काम करणाऱ्या श्रेणीमध्ये रायगड जिल्ह्यातील तळोजा एमआयडीसी भागातील एसकेएम स्टील्स लिमिटेड विजेती कंपनी ठरली आहेया कंपनीस आज पुरस्काराने गौरविण्यातआले.

अपघात मुक्त वर्षाच्या आधारावर 1 लाख श्रम तासांपेक्षा अधिक व 2.5 लाख श्रम तासांपर्यत काम करणाऱ्या कंपनीच्या श्रेणीमध्येही पुणे येथील सणसवाडी भागातील कुपर स्टँडर्ड ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमीटेड विजेती ठरली आहे याच श्रेणीमध्ये ठाणे जिल्ह्यातील भिंवडी येथील गोदरेज एण्ड बॉयस मैन्यू कंपनी विजेती ठरली आहे. या कपंनीना आज राष्ट्रीय सुरक्षा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

50 हजार श्रमतांसापेक्षा अधिक व 1 लाख श्रम तासांपर्यंत काम करणाऱ्या संस्थाच्या श्रेणीमध्येही रायगड जिल्ह्यातील तळोजा एमआयडीसी भागातीलएसकेएम स्टील्स लिमिटेड विजेती कंपनी ठरली असून यासाठीही या कंपनीला पुरस्कार प्रदान करण्यात आले. याच श्रेणीमध्ये या श्रेणीमध्येच नागपूर येथीलबुटीबोरी भागातील रिलायंस सिमेंट कंपनी प्रायव्हेट लिमिटेड उपविजेती ठरलीअसून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

अपघात मुक्त वर्षाच्या आधारावर तसेच 5 लाख श्रम तासांपेक्षा अधिक आणि 10 लाख श्रम तासांपर्यंत काम करणाऱ्या कंपनीच्या श्रेणीमध्ये रायगडजिल्हयातील रोहा तालुक्यातील अमडोशी येथील सुप्रीम पेट्रोकेमिकल लिमीटेडकंपनीला याच श्रेणीमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील वळुंज, गंगापूर येथील गरवारे इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनीही उपविजेती ठरली आहे. या कंपनीसही पुरस्काने सन्मानित करण्यात आले.

5 लाख श्रम तासांपेक्षा अधिक आणि 10 लाख श्रम तासांपर्यंत काम करणा-या कंपनींच्या श्रेणीमध्ये रायगड जिल्ह्यातील रोहा येथील सुप्रीम पेट्रोकेम लिमिटेड कंपनी तसेच या श्रेणीमध्येच औरंगाबाद जिल्ह्यातील वाळुंज येथील गरवारे पॉलिस्टर लिमिटेड ही कंपनी उपविजेता ठरली आहे या औद्योगिक संस्थांना आज पुस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्रमाणपत्र व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरुप होते. रोख रक्कम कंपन्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom