Type Here to Get Search Results !

शार्क माशांचे ८ हजार किलो कल्ले (फिन्स) जप्त


मुंबई - महसूल गुप्तचर विभागाने (डीआरआय) मुंबई आणि गुजरातमधून शार्क माशांचे ८ हजार किलो कल्ले (फिन्स) जप्त केले आहेत. हे कल्ले चीन आणि हाँगकाँगमध्ये तस्करीच्या मार्गाने पाठवण्यात येणार होते असे, अधिकाऱ्यांनी सांगितले.

जप्त केलेले हे शार्क माशांचे कल्ले सुक्या माशांच्या नावाखाली चीन आणि हाँगकाँगमध्ये पाठवण्यात येणार होते, अशी माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्याने दिली. शार्क माशांच्या सर्व जातींच्या शिकारीवर आणि त्यांच्या तस्करीवर कायद्याने बंदी आहे. डीआरआयने १ सप्टेंबर रोजी केलेल्या कारवाईमध्ये मुंबईतील शिवडीतील एका गोदामातून शार्क माशांचे ८ हजार किलो कल्ले आणि गुजरातच्या वेरावल येथील एका गोदामातून ५ हजार किलो कल्ले जप्त केले आहेत. या तस्करी प्रकरणी डीआरआयने चार जणांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये या सर्व तस्करीच्या सूत्रधाराचाही समावेश आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
Tags

Top Post Ad

Below Post Ad