Type Here to Get Search Results !

लोकलवर दगडफेक, महिला जखमी

ठाणे - जलद लोकलवर केलेल्या दगडफेकीत शंकुतला बागुळे (४९) या जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी दिव्यात घडली. त्यांच्या कपाळाला जखम झाली असून, त्यांच्यावर ठाणे रेल्वे स्थानकातील प्रथमोपचार केंद्रात उपचार केल्यानंतर घरी सोडून देण्यात आले. नेरळ येथे राहणाऱ्या बागुळे या कसारा येथे नातेवाईकांकडे गेल्या होत्या. तेथून सीएसएमटी लोकलने ठाण्यात येताना दुपारी दिवा स्थानकातून रेल्वे फलाटावरून सुटल्यावर अज्ञाताने चालत्या गाडीवर दगड भिरकावला. तो दगड द्वितीय श्रेणीच्या महिला डब्यात बसलेल्या बागुळे यांच्या कपाळाला लागला. या वेळी डब्यात बसलेल्या महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाच्या कल्याण अध्यक्षा अरुणा गोफणे आणि उल्हासनगर अध्यक्षा आशा मदणे यांनी बागुळे यांना ठाणे रेल्वे स्थानकात उतरवले. तसेच ठाणे रेल्वे प्रबंधक कार्यालयामार्फत तेथील वन रुपी क्लिनीकमध्ये नेऊन त्यांच्यावर उपचार केले. बागुळे यांच्या कपाळावर जखम झाली असून, त्यावर मलमपट्टी करून त्यांना घरी सोडल्याची माहिती क्लिनीकचे डॉ. राहुल घुले यांनी दिली.

Top Post Ad

Below Post Ad