पालिका रुगणालायत झुरळानंतर आता शाळांना वाळवी - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

27 September 2018

पालिका रुगणालायत झुरळानंतर आता शाळांना वाळवी


मुंबई - महापालिकेच्या सायन रुग्णालयात प्रसूती कक्षात झुरळे असल्याने पालिकेवर टिका सुरु आहे. अशी टिका सुरु असतानाच पालिकेच्या शाळांमध्ये वाळवी लागल्याचा प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सईदा खान यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणला आहे. यामुळे पालिका प्रशासनावर होणाऱ्या टिकेत आणखी भर पडली आहे.

मुंबई महापालिकेच्या गोवंडी येथील एच.पी. शाळेत वाळवी लागली आहे. इमारतीच्या भिंतीला व कपाटांमध्ये ठेवण्यात आलेल्या पुस्तकांनाही वाळवी लागली आहे. त्यामुळे चांगली पुस्तके खराब झाल्याचा हरकतीचा मुद्दा नगरसेविका सईदा खान यांनी गुरुवारी शिक्षण समितीच्या बैठकीत उपस्थित केला.  
पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. एच.पी. स्कूलमध्ये 2013 पासून वाळवी पसरलेली आहे. त्यावेळी मी प्रश्न उपस्थित केल्यावर शाळेत पेस्ट कंट्रोल केले होते. परंतु त्यानंतर पुन्हा शाळेत पेस्ट कंट्रोल झाले नसल्याने पुन्हा वाळवी पसरली आहे. शाळेच्या इमारतीची डागडुजी करणार असल्याचे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र वाळवीला नियंत्रणात आणले नाही तर ही डागडुजीही निरुपयोगी ठरेल, असा आरोप सईदा खान यांनी केला.

परळमधील पालिकेच्या काही शाळा बंद पडल्या आहेत. या शाळांमधील भंगार साईनाथ महापालिकेच्या पाचव्या मजल्यावर टाकण्यात आले आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे या मजल्यावर सर्वत्र वाळवी पसरली आहे. त्यावर लवकर पेस्ट कंट्रोल न केल्यास संपूर्ण इमारतीला वाळवी लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती परळ येथील शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी दिली.

शिक्षण विभागाच्या सर्व प्रशासकीय अधिकार्‍यांनी त्यांच्या विभागातील शाळांमध्ये पेस्ट कंट्रोल करणे आवश्यक आहे. त्यानुसार त्यांनी खासगी कंत्राटदारामार्फत तातडीने पेस्ट कंट्रोल करून घ्यावे, अशा सूचना शिक्षण समितीचे अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी पालिका प्रशासनाला दिल्या आहेत.

Post Top Ad

test