प्रवासी व पोलिस यांच्याशी उद्धट वर्तन करणाऱ्या रिक्षाचालकांविरुद्ध कारवाई - परिवहनमंत्री - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

11 October 2018

प्रवासी व पोलिस यांच्याशी उद्धट वर्तन करणाऱ्या रिक्षाचालकांविरुद्ध कारवाई - परिवहनमंत्री

मुंबई - कल्याण रेल्वे स्थानक येथे रिक्षाचालकाकडून वाहतूक विभागाच्या महिला पोलीस कर्मचाऱ्यासंबंधी घडलेल्या घटनेची परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी तातडीने दखल घेतली. या परिसरातील प्रवासी तसेच पोलिस यांच्याशी उर्मट, उद्धट वागणाऱ्या रिक्षाचालकांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

वाहतूक विभागाच्या महिला कर्मचारी आशा गावडे या आपले कर्तव्य बजावत असताना रिक्षाचालकाकडून त्यांनी परवाना मागितला, त्या वेळेस परवाना न देता रिक्षा चालकाने महिला कर्मचाऱ्यास फरफटत नेले. या घटनेची दखल परिवहनमंत्री रावते यांनी घेत रिक्षाचालकाविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले.

रिक्षाचालकांविरुद्ध वारंवार उद्धट वर्तन, भाडे नाकारणे, जादा भाडे घेणे, विना परवाना, विना बॅच, विना परवाना वाहन चालविण्याची तक्रार होत असल्यास कल्याण-डोंबिवली भागातील रिक्षाचालकांविरुद्ध धडक मोहीम सुरू करण्याचे आदेशही त्यांनी दिले. या मोहीमेअंर्गत आजपर्यंत परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी 1025 रिक्षा चालकांची तपासणी केली. त्यापैकी 184 रिक्षा चालकांना नोटीस देण्यात आल्या आहेत. पैकी 60 वाहने ताब्यात घेतली आहेत.

या मोहिमेसाठी परिवहन विभागाच्या ठाणे, पनवेल,मुंबई पूर्व व उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण व वसई येथील वायुवेगपथकामार्फत 10 पथके नियुक्त करण्यात आली आहेत. ज्या वाहनांना परवाने नसतील त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील. गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार वाहन मालक तसेच परवानाधारकांचे परवाने निलंबित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Post Top Ad

test