मुंबईत इंटरनॅशनल बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिप स्पर्धा

Anonymous

भारतातील शरीरसौष्ठवाची सर्वात ग्लॅमरस स्पर्धा म्हणजे इंटर नॅशनल बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिप ,डायमंड कप इंडिया २०१८ आज पासून अंधेरीत सुरू झाली .अंधेरीत पूर्व येथील महाकाली गुंफा रोड येथील हॉली फॅमिली शाळेच्या पटांगणात रंगणार आहे .इंडियन बॉडीबिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन यांच्या वतीने घेण्यात येणारी ह्या स्पर्धेत वेगवेगळ्या 40 देशांतील स्पर्धकांसह, नेव्ही, ओडिशा, दिल्ली, तामीळनाडू, हरयाणा, उत्तर प्रदेशचे स्पर्धक सहभागी होणार आहे.शरीरसौष्ठवातील सर्वात मानाची ही स्पर्धा शनिवारी आणि रविवारी मुंबईत अंधेरीत रंगेल. या स्पर्धेच्या सोबतीला मोजक्या मिश्र दुहेरीतील फिट ऍण्ड फाइन जोड्या आपले तालबद्ध फिटनेस प्रदर्शन दाखविण्यासाठी उत्सुक आहेत असे इंडियन बॉडीबिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनचे सरचिटणीस संजय मोरे यांनी सांगितले.

यंदाची ही स्पर्धा गतवेळपेक्षा अधिक ग्लॅमरस आणि भव्यदिव्य करण्यासाठी हॉली फॅमिली शाळेच्या पटांगणात आयोजित करण्यात आली आहे. देशातील आणि जगातील सर्वात पीळदार आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उंचावणाऱया ३० दिग्गज शरीरसौष्ठवपटूंचा या स्पर्धेत सहभाग असल्याने या स्पर्धेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. इंडियन बॉडीबिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन आयोजनाखाली होत असलेली स्पर्धा क्लासिक ठरावी म्हणून मि.वर्ल्ड, मि.एशिया, मि. इंडियासारखे सर्वोच्च बहुमान संपादणारे सर्वच खेळाडू आपले कसब पणाला लावताना दिसले.
Tags