महिला अत्याचार विरोधात मुंबईत महिला परीषद

Anonymous

मुंबई - महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने कुसुम औद्योगिक संस्था यांच्या विद्यमाने येत्या गुरुवारी महिला अत्याचार विरोधी परीषदेचे आयोजन करण्यात आले आले. या परीषदेत महिलावरील अत्याचार, पोस्को कायदा,कौटुंबिक अत्याचार,बालकांचे शोषण तसेच युवतींना भेडसावणाऱ्या समस्या आदी विविध विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.त्याचबरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सत्कारही यावेळी करण्यात येणार असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा अक्षदा अविनाश गायकवाड यांनी सांगितले आहे.

सदर परीषद गुरूवार दिनांक २५ ऑक्टोबर २०१८ रोजी दुपारी १२ वाजता मुंबई मराठी ग्रंथालय,दुसरा मजला सुरेंद्र गावस्कर सभागृह,मुंबई मराठी ग्रंथालय मार्ग दादर पुर्व नायगाव मंबई ४०००१४ येथे आयोजित करण्यात आली असून या परीषदेत महिला आयेगाच्या सदस्या विंदाताई किर्तीकर,अॅड.आशाताई लांडगे,पोलिस उपनिरीक्षक पुनम अगरवाल आणि सुनिता दिघे, तसेच प्रकल्प अधिकारी महिला आयोग अंजली काकडे मार्गदर्शन करणार आहेत.महिला बचत गटाच्या संचालका तसेच स्वयंसेवी संस्थेच्या महिलांनी यावेळी आवर्जून उपस्थित राहावे रहावे.असे आवाहन संस्थेने केले आहे.
Tags