राज्यात पेट्रोल 5 रुपयांनी कमी - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

04 October 2018

राज्यात पेट्रोल 5 रुपयांनी कमी

मुंबई - केंद्र शासनाने केंद्रीय उत्पादन शुल्कात दीड रुपये प्रतिलिटर, ऑईल कंपनीने आधारभूत किंमतीत 1 रुपया प्रतिलिटर आणि राज्य शासनाने मूल्यवर्धित करासह 2.50 रुपयांचा भार उचलल्याने राज्यात आता पेट्रोलचे दर प्रतिलिटर मागे 5 रुपयांनी कमी होतील.

महाराष्ट्र शासनाने मूल्यवर्धित करात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राच्या निर्णयाच्या परिणामांसह त्या अनुषंगाने आज वित्त विभागाकडून अधिसूचना निर्गमित होत आहे. या कर कपातीमुळे राज्याच्या महसूलावर प्रतिवर्षी सुमारे 1250 कोटी रुपयांचा भार पडणार आहे.

या निर्णयामुळे राज्यातील सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. तसेच सर्वसामान्य जनतेच्या हिताचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी प्रधानमंत्री आणि केंद्रीय अर्थमंत्री यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Post Top Ad

test