विहिरीत बुडून चिमुकलीसह दोन महिलांचा मृत्यू

Anonymous
मुंबई - मुंबईच्या विलेपार्ले पूर्व येथील एका विहिरीचा कठडा कोसळल्याने अठरा महिला आणि लहान मुले विहिरीत पडल्याची धक्कादायक घटना मंगळवारी संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास घडली. त्यात दोन महिलांसह एका तीन वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. 

उत्तर भारतीयांमधील विश्वकर्मा समाजातील महिला मुलांच्या दीर्घायुष्यासाठी एक दिवसाचे व्रत करतात. सूर्यास्तावेळी विहिरीजवळ पूजा करून हे व्रत सोडले जाते. त्यासाठी महिला आपल्या मुलांना घेऊन विहिरीकाठी जमा होतात. फुले व हळदकुंकू वाहण्यासाठी एकापाठोपाठ एक अशा जवळपास २० महिला विहिरीवरील संरक्षक जाळीवर चढल्याने जाळी आणि विहिरीच्या कठड्याचा भाग कोसळून त्या पाण्यात पडल्या. स्थानिकांनी धाव घेऊन साड्या, ओढण्यांच्या मदतीने महिलांना वाचवण्याचे प्रयत्न केले. अग्निशमन दल आणि पोलिसांनी १६ ते १७ महिलांना सुखरूप बाहेर काढले. रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम आणि बचाव कार्य सुरू होते. मात्र, गाळ आणि काळोखामुळे शोधकार्यात अडथळे येत होते. जखमी महिलांना उपचारासाठी व्ही. एन. देसाई आणि कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी माधवी पांडे (४९), रेणू यादव (२०) आणि दिव्या (३) या तिघांचा मृत्यू झाला आहे. 
Tags