महाराष्ट्राचा गोरखपूर होवू देवू नका -ब्रिगेडियर सावंत

Anonymous
मुंबई - चार वर्षात फडणवीस सरकारने सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मरणपंथाला आणली. औषधांचा तुटवडा निर्माण केला सामान्य रुग्ण उधारी करून औषध विकत आणतोय रुग्णालयात चिठ्ठ्या देवून खाजगी डॉक्टरकडे पाठविण्याचे गैरप्रकार होत आहेत हा आरोग्य व्यवस्थेचा दुष्काळ युती सरकारने म्हणजेच सापनाथने तयार केला आहे आणि याआधी नागनाथ कॉंग्रेस सरकारने असेच जनतेचे हाल करून ठेवले आहेत. हे असेच चालत राहिले तर महाराष्ट्राचा गोरखपूर व्हायचा अशी टिका आपचे महाराष्ट्र संयोजक ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी केली.

आप महाराष्ट्र आरोग्य विभाग द्वारे राज्यातील सार्वजनिक रुग्णालयाच्या सोशल ऑडीटच्या मोहिमेची सुरुवात सायन रुग्णालयापासून झाली. त्या प्रसंगी ब्रिगेडियर सुधीर सावंत , 'आप' राज्य आरोग्य विभागाचे संयोजक प्रख्यात बाल शल्य चिकित्सक डॉ संतोष करमरकर यांच्या व मुंबई आरोग्य समन्वयक अमोल जाधव यांच्या नेतृत्वात 'आप 'च्या एम एम आर विभागातील कार्यकर्त्यांसह सायन लोकमान्य टिळक रुग्णालयाला भेट देवून पाहणी केली. पुढील १५ दिवसात सर्व जिल्हा सरकारी रुग्णालयात पाहणी केली जाईल आणि त्याचा अहवाल आल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांना तो दिला जाईल अशी माहिती त्यांनी प्रसार माध्यमांना दिली. मोहिमेवेळी ''आप''चे १०० कार्यकर्ते रुग्णालयाबाहेर हजर होते.

डॉ संतोष करमकर यांनी मागणी केली केली कि, ज्या सुविधा निदान नियमानुसार असायला हव्यात . त्या जर रुग्णांना मिळाल्यास आणि तात्काळ औषधांचा पुरवठा झाल्यास रुग्णाला दिलासा मिळेल. असे पहावे . प्रसार माध्यमांशी बोलताना डॉ करमरकर म्हणाले , राज्यातील सरकार केवळ 3 टक्के पैसा आरोग्यावर खर्च करते दिल्लीत मात्र 12 टक्के पैसा 'आप' सरकार करीत आहे . हि बाब ह्या फडणवीस सरकारने शिकण्यासारखी आहे . 'आप ' आरोग्य विभाग वतीने 35 जिल्ह्यात आरोग्य पथक तयार केले जात आहेत त्याची सुरुवात आज पासून आम्ही केली आहे. रस्त्याच्या कडेला अत्यंत शांतपणे आणि रूग्णालया बाहेर युती सरकार ने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे कसे बारा वाजवले त्याबाबत माहिती पत्रक वाटले . जनतेने भरभरून प्रतिसाद दिला . स्थानिक रुग्ण सलमा शेख म्हणाल्या कि ,' जसे दिल्लीत केले तसे राज्यात ''आप '' ने करून दाखवावे अल्ला तुम्हारे साथ है आम्ही त्याची वाट पाहात आहोत .अशी अशा त्यांनी व्यक्त केली.

सायन रुग्णालयाच्या अधिष्ठाता जयश्री मौंडक्रर यांनी सांगितले कि, '' एकूण वार्ड पैकी एका ४० रुग्णांच्या वार्ड मध्ये खाटांची ४० मर्यादा असताना येथे १२० रुग्ण असतात खूप लोक येतात . त्यामुळे प्रचंड ताण आमच्यावर असतो .मी आमच्या परीने ह्या रुग्णालयात जे सर्वोत्तम आहे ते करण्याचा प्रयत्न करेन''.तसेच रुग्ण बाबतची माहिती पुढील 4 दिवसात देते असे त्या म्हणाल्या.
Tags