सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले १५ नोव्हेंबर रोजी साधणार जनतेशी ई-संवाद - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

13 November 2018

सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले १५ नोव्हेंबर रोजी साधणार जनतेशी ई-संवाद

मुंबई, दि. 13 : सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले, हे राज्यातील जनतेशी गुरुवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता लाईव्ह ई-संवाद साधणार आहेत. ऐरोली, नवी मुंबई येथील, पार्थ नॉलेज नेटवर्कच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून बडोले ई-संवाद साधणार आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून गेल्या चार वर्षांच्या कालावधीत राज्यातील अनुसूचित जाती, विमुक्त आणि भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, दिव्यांग, आणि निराश्रीत इत्यादी समाजघटकांसाठी कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणी बरोबरच सामाजिक प्रबोधनाचे अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. ई-संवादद्वारे जनतेच्या विविध प्रश्नांची उत्तरे बडोले देणार आहेत.

या कार्यक्रमात elearning.parthinfotech.in लिंक द्वारे सहभागी होऊन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या योजनांची अंमलबजावणी,त्यांची यशस्विता, याबाबतचे प्रश्न, 8384858685 या क्रमांकावर व्हॉट्सअॅपद्वारे बडोले यांना विचारावेत, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे करण्यात येत आहे.

Post Top Ad

test