वरळी दूरदर्शन केंद्राला आग

JPN NEWS

मुंबई - आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास वरळीच्या दूरदर्शन केंद्रातील दुसऱ्या मजल्याला आग लागल्याने एकच धावपळ उडाली. आगीचा फटका बसल्याने एफएमचं प्रसारणही बंद करण्यात आलं. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आगीवर युद्धपातळीवर नियंत्रण मिळवलं. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी दूरदर्शन केंद्रातील दुसऱ्या मजल्याचं बरचसं नुकसान झाल्याचं सांगण्यात येतं. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून अधिक तपास सुरू आहे. 
Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !