राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने शिवसेनेत


कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर झालेल्या समारंभात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवेदिता माने यांच्या हातावर शिवबंधन बांधले. यावेळी शिवसेनेचे नेते मनोहर जोशी, एकनाथ शिंदे, संजय मंडलिक हे उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी निवेदिता माने यांचा मुलगा धैर्यशिल माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यापाठोपाठ आज त्यांनी सुध्दा शिवसेनेत प्रवेश करत शिवबंधन हातात बांधले.

दरम्यान उध्दव ठाकरे यांनी असे म्हटले आहे की, कोल्हापुरातील शिवसेनेच्या दादा मंडळींना हक्काची ताई मिळाली आहे. कोल्हापूरातून सुरू झालेली ही वारी सगळीकडे पसरेल आणि सगळीकडे भगवा फडकेल असे मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसने माने गटाला सातत्याने गृहित धरल्याने तसेच हातकणंगले मतदारसंघ माने गटाचा असताना अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना उमेदवारी बहाल करण्याचे ठरवल्याने माने गट नाराज झाला होता.
Previous Post Next Post