केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना अंबरनाथमध्ये मारहाण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 December 2018

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना अंबरनाथमध्ये मारहाण

मुंबई - केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना शनिवारी अंबरनाथमधील एका कार्यक्रमात मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला. येथील विमको नाका परिसरात रिपाईकडून संविधान गौरव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रामदास आठवले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी रामदास आठवले यांनी भाषणही केले. यानंतर ते स्टेजवरून उतरून गाडीकडे चालत जात असताना एका व्यक्तीने त्यांच्या कानशिलात लगावली. तेव्हा आजुबाजूच्या कार्यकर्त्यांना लगेचच या व्यक्तीला पकडून चोप दिला. या प्रकारानंतर रामदास आठवले मुंबईकडे रवाना झाले आहेत. पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे. प्राथमिक चौकशीनंतर या व्यक्तीचे नाव प्रवीण गोसावी असल्याचे समोर आला आहे. तो आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता आहे. प्राथमिक उपचारानंतर प्रवीण गोसावी याला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. या घटनेनंतर अंबरनाथ व उल्हासनगर परिसरात काहीसा तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

Post Bottom Ad