रुग्णालयाच्या माध्यमातून मुंबईकरांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न – महापौर

Anonymous
मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेने कान, नाक, घसा रुग्णालयाचे नूतनीकरण करुन सर्व वैद्यकिय साहित्यांनी सुसज्ज असे अद्ययावत शस्त्रक्रि‍यागार व श्रवण प्रयोगशाळेची निर्मिती केली असून या रुग्णालयाच्या माध्यमातून मुंबईकरांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याच प्रयत्न असल्याचे प्रतिपादन मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले.

‘सेठ आत्मासिंग जेसासिंग बांकेबिहारी महापालिका कान, नाक, घसा रुग्‍णालयातील अद्ययावत मॉडयुलर शस्त्रक्रियागार व श्रवण प्रयोगशाळेचे लोकार्पण मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते सेठ आत्मासिंग जेसासिंग बांकेबिहारी महापालिका कान, नाक, घसा रुग्णालय , महात्मा गांधी मार्ग व महर्षी दधिची मार्ग जोडरस्ता, फोर्ट, मुंबई येथे आज आयोजित कार्यक्रमात पार पडले, त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी उप महापौर हेमांगी वरळीकर, सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्षा डॉ. अर्चना भालेराव, स्थानिक नगरसेविका सुजाता सानप, उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) सुनिल धामणे, संचालक (अभि‍यांत्रिकी सेवा व प्रकल्प) (प्र.) सलील उपशाम, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर, प्रमुख अभियंता (इमारत परिरक्षण) अनंत कदम तसेच बांकेबिहारी यांचे वंशज नंदकिशोर बजाज व संबंधित अधिकारी , डॉक्टर्स उपस्थित होते. 

महापौर विश्वनाथ महाडेश्वर यावेळी मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, या रुग्णालयाच्या नूतनीकरणाचे काम खुप चांगल्या रितीने करण्य त आले असून रुग्णांना चांगली सेवा मिळावी हा आपला मुख्य उद्देश असल्याचे महापौर म्‍हणाले .रुग्णांची सेवा हे एक टिमवर्क असून या रुग्णा लयाच्या वैद्यकीय प्रमुख डॉ. दिपिका राणा व त्यांची टिम ही सेवा चांगल्यारितीने करीत असल्याचे महापौरांनी सांगून सर्व डॉक्टर परिचारीका अधिकारी यांना शेवटी शुभेच्छा दिल्या.

उप महापौर हेमांगी वरळीकर यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाल्‍या की, महापालिका अद्ययावत अश्या वैद्यकिय तंत्रज्ञानाचा उपयोग करुन दर्जेदार आरोग्य सेवा नागरिकांना देत असून नागरिकांनी या आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांंनी याप्रसंगी केले. 

सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्षा डॉ. अर्चना भालेराव यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, या रुग्णालयाचे नूतनीकरणाचे काम खुप चांगले झाले असून कान, नाक, घसाच्या आजाराबाबत असलेल्या‍ अत्यााधुनिक सेवेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

स्थानिक नगरसेविका सुजाता सानप यावेळी मार्गदर्शन करताना म्ह‍णाल्या की, याठिकाणी दररोज तीनशेच्या जवळपास रुग्ण औषधोपचारासाठी येत असून माझ्या नगरसेवक पदाच्या कारकिर्दीत या रुग्णालयाचे नूतनीकरणाचे काम पूर्ण होत असल्याचा आनंद होत असल्यााचे त्यांनी सांगितले.

या रुग्णाालयाची थोडक्यात माहिती – 
नव्याने तयार केलेल्या ऑपरेशन थि‍एटरमध्ये अॅटिबैक्टेरियल सॉलिड मिनरल सरफेस कंपोजिट पॅनल वॉल क्लेेडिंग आणि अॅंटिबैक्टीेरियल फ्लोरिंग लावण्या‍त आले आहे ज्यामुळे लॅमिनेर हवेच्या प्रवाह सोबत शस्त्रक्रिया विभागात सर्वोत्तम वातावरण प्रदान करुन विषाणुंचे संक्रमण कमी करते. सर्जेन पेंडट बसविण्यात आले असून शस्त्रक्रियेसाठी लागणारी यंत्रणा त्यावर ठेवून मोकळी जागा प्राप्त होणार आहे. आता शस्त्र्क्रिया या लेजर मशिनव्दारे करण्यात येतील ज्यात कमीतकमी रक्ताचा नाश होतो. तसेच स्वरयंत्रावर असलेल्‍ या गाठीच्या शस्त्रेक्रि‍या सुलभरित्या लेजर मशिनव्दारे करण्यात येतील. कानाच्या‍ व नाकाच्या आजाराच्या शस्त्रक्रिया कमीतकमी वेळेत करता येईल तसेच नाकाची फेस ही शस्त्रकिया रक्ताचा कमीतकमी नाश मध्ये करण्यायत येईल.
Tags