कांदिवलीत आगीत ४ जणांचा मृत्यू


मुंबई - रविवारी कांदिवली पूर्वे येथील दामू नगर परिसरातील जीन्स फॅक्टरीला रविवारी (२३ डिसेंबर) भीषण आग लागल्याची घटना घडली होती. या आगीत चार जणांचा मृत्यू झाला आहे. ही आग विझल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना चार जणांचे मृतदेह सापडले. राजू विश्वकर्मा (३०), राजेश विश्वकर्मा (३६), भावेश पारेख (५१), सुदामा लल्लनसिंग (३६) अशी मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. हे चार ही जण गोदामात काम करणारे कर्मचारी असून काम करताना अचानक आग लागल्यामुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Tags