वरळी स्मशानभूमीत रमाई स्मारकासाठी धरणे

Anonymous

मुंबई - वरळी मुंबई येथील स्मशानभुमीत कोट्यवधी भारतीयांची माई रमाई यांचे अंतिम संस्कार झाले. तेव्हा पासून डॉ बाबासाहेब आंबेडकर आपल्या त्यागमूर्ति माता रमाई यांच्यावर अंतिम संस्कार झालेल्या जागेवर जावून नमन करायचे. बाबासाहेबानंतर या पवित्र जागेचा विसर पडला होता. या समशानभुमीत माई रमाई याचे राष्ट्रीय पातळीवर स्मारक शासनाने निर्माण करावे. माता रमाई स्मारक झालेच पाहिजे या करिता राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांच्या नेतृत्वाखाली आंबेडकरी विचार मोर्चा ग्रुपच्यावतीने वरळी स्मशान भुमी येथे धरणे आंदोलन करण्यात आले. 

बागडे पुढे म्हणाले ज्या प्रमाणे जिजाऊ अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई यांचे स्मारक त्यांच्या अंतिम संस्कार स्थळी तयार करण्यात आले त्याच धर्तीवर माई रमाई रमाई यांचे राष्ट्रीय पातळीवर स्मारक झालेच पाहिजे. जेणेकरून चैत्यभूमीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली देण्यासाठी लाखो बांधव येतात, पंरतु माईचे श्रंद्धास्थान नदारत असल्याने लाखो भाविक र्दशना पासून वंचित होतात. जेव्हा पंंर्यत शासन दखल घेणार नाही तेव्हा पंर्यत संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलने सुरु राहील असा इशारा बागडे यांनी दिला.
Tags