Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

राष्ट्रवादीच्या 18 बंडखोर नगरसेवकांची हकालपट्टी


अहमदनगर – महापौर निवडणुकीत भाजपला पाठिंबा देणार्‍या 18 नगरसेवकांची राष्ट्रवादी कॉंग्रेसने पक्षातून हकालपट्टी केली आहे. याशिवाय शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते यांनाही पदावरून हटविण्यात आले आहे. मात्र आमदार संग्राम जगताप यांना अभय मिळाले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हा आदेश काढला आहे.

अहमदनगर महापौर निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर भाजपचे बाबासाहेब वाकळे महापौर झाले. शिवसेनेला सवार्धिक 24 जागा मिळवूनही महापौरपदापासून वंचित राहावे लागते. राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. पक्षाध्यक्ष शरद पवार अहमदनगर येथे आले असता पाठिंबा देणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले होते. त्यानंतर जयंत पाटील यांनी ही कारवाई केली. मात्र, आमदार संग्राम जगताप यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही.

जिल्हाध्यक्षांना पदावरुन हटवले 
महापौरपदाच्या निवडणुकीसाठी जातीयवादी पक्षांना पाठिंबा देऊ नये अथवा आपल्या पक्षाच्या नगरसेवकांनी त्यांच्या बाजूने मतदान करू नये, असे स्पष्ट आदेश पक्षाने दिलेले होते. परंतु पक्षाचा आदेश डावलून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवारासा पाठिंबा देऊन मतदान केले. अशा प्रकारच्या पक्षविरोधी घडामोडी होत असताना याबाबतची माहिती अथवा कल्पनाही आपण पक्षश्रेष्ठींना दिलेली नव्हती. याबाबतचे स्पष्टीकरण 7 दिवसांत करावे म्हणून आपणास नोटीस पाठविण्यात आलेली होती.

आपण याबाबत अद्यापपावेतो खुलासा न केल्यामुळे आपण पक्षशिस्त भंग केलेली आहे. म्हणून आपणास अध्यक्षपदावरून हटवण्यात येत आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसने जिल्हाध्यक्षांना पाठविलेल्या कारवाईबाबतच्या पत्रकात म्हटले आहे. ही कारवाई 18 नगरसेवकांसह शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते यांच्यावर करण्यात आली आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom