दोन बाईक चोरांना अटक, 29 बाईक जप्त


मुंबई - बाईक चोरीच्या गुन्ह्यांतील दोन वॉंटेड आरोपींना येलोगेट पोलिसांनी अटक केली. या दोन्ही आरोपींकडून 6 लाख 31 हजार रुपयांचे चोरीचे 29 बाईक पोलिसांनी जप्त केले आहेत. या बाईक या दोन्ही आरोपींनी मुंबईसह नवी मुंबईतून चोरी केल्याची कबुली दिली आहे.

जानेवारी महिन्यांच्या पहिल्याच आठवड्यात शिवडी परिसरातून हर्षद प्रकाश कोळी यांची एक बाईक काही अज्ञात चोरट्यांनी चोरी केली होती. दुसर्‍या दिवशी हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी बाईक चोरीचा गुन्हा नोंद करुन तपासाला सुरुवात केली होती. या गुन्ह्यांचा येलोगेट आणि शिवडी पोलीस संमातर तपास करीत होते. या वेळी सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक माहितीवरून मेराज शेख या तरुणाला पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या चौकशीत त्याने ही बाईक त्याचा सहकारी मुस्ताक मन्सुरीच्या मदतीने चोरीची कबुली दिली होती. त्यानंतर मेराजला अटक केली. पोलीस तपासात या दोघांनी गेल्या दोन वर्षांत मुंबई आणि नवी मुंबईतून अनेक बाईक चोरी केल्याची कबुली दिली. दोन्ही आरोपी बाईक चोरीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्यांच्याकडून 29 चोरीचे बाईक पोलिसांनी जप्त केले आहे. चोरीच्या या बाईक त्यांनी वाशी, सीबीटी, बेलापूर आणि खारघर परिसरात
ठेवली होती.
Tags