व्ही. एन. पूरव मार्गावरील बेकायदा बांधकामांवर महापालिकेचा हातोडा

Anonymous
मुंबई - व्ही. एन. पूरव मार्गावर उभारण्यात आलेल्या बेकायदा २५ बांधकामांवर महापालिकेने बुधवारी हातोडा चालवला. या कारवाईमुळे वाहतूक कोंडी फूटण्यास मदत होणार असून मुंबईकरांना दिलासा मिळेल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

सायन- तूर्भेकडील व्ही. एन. पूरव मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. याच रस्त्यावरील देवनार बस डेपोजवळ गेल्या ३० वर्षांपासून सुमारे २५ अतिक्रमणे उद्भवली होती. ज्यामुळे सदर ठिकाणी १७५ फूट रुंदी असणाऱ्या रस्त्याची रुंदी सुमारे १५० फूट होऊन त्याठिकाणी वाहतूक कोंडी होत होती. बुधवारी या बांधकांमावर पालिकेच्या परिमंडळ - ५ चे उपायुक्त भारत मराठे यांच्या मार्गदर्शनानुसार 'एम पूर्व' विभागाने कारवाई केली. २ जेसीबी, १ डंपर यासह इतर आवश्यक वाहने व साधनसामुग्री कारवाईसाठी वापरण्यात आली. मुंबई पोलीसांच्या मदतीने यशस्वीपणे कारवाई करण्यात आली, अशी माहिती एम पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास किलजे यांनी दिली.
Tags