महापौर विश्वनाथ महाडेश्वर लिलावतीत दाखल

मुंबई - मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर उलट्या होऊ लागल्याने त्यांना गुरुवारी रात्री उशिरा वांद्रे येथील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महापौर महाडेश्वर यांच्यावर काही वर्षांपूर्वी बायपास सर्जरी झाली होती. महाडेश्वर हे आधीपासूनच रक्तदाब व इतर आजारानी त्रस्त आहेत. गुरुवारी उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने त्य़ांना आधी केईएम रुग्णालयांत व त्यानंतर लिलावतीमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
Tags