Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

केनियाचा कॉसमस लॅगट मॅरेथॉन २०१९चा विजेता


मुंबई - जगभरातील अव्वल धावपटूंसह बॉलिवूड कलाकार, दिग्गज खेळाडू, उद्योजक, ॲथलेटीक्स, युवक यांचा सहभाग असलेल्या मुंबई मॅरेथॉनची सुरुवात राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी गनशॉटद्वारे केली. उद्घाटनप्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई, आमदार आशिष शेलार यांच्यासह उद्योग व नाट्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

केनियाचा कॉसमस लॅगट मुंबई मॅरेथॉन २०१९ चा विजेता ठरला आहे. तर महिला गटात इथियोपियाची अलेमू विजयी ठरली आहे. मॅरेथॉनच्या भारतीय गटात आर्मीचे नितेंद्र सिंग रावत विजयी ठरले आहेत. मुंबई मॅरेथॉनला आज सकाळी ५:४० वाजल्यापासून सुरुवात झाली. या मॅरेथॉनची मुख्य स्पर्धा ही ४२ किलोमीटरची होती. दरम्यान, २१ किलोमीटरच्या हाफ मॅरेथॉनमध्ये १४ हजार ४५७ धावपटूंनी सहभाग घेतला होता. हाफ मॅरेथॉनच्या पुरुष गटामध्ये श्रीणू मुगाता यांचा प्रथम क्रमांक आला आहे. तर करण थापा दूसरे आणि कालिदास हिरवे यांचा तिसरा क्रमांक आला आहे. हाफ मॅरेथॉनच्या महिला गटामध्ये मंजू यादव यांचा प्रथम क्रमांक आला. तर साईगिता नाईक यांनी दूसरा तर मिनू यांनी तिसरा क्रमांक पटकावला आहे.

मॅरेथॉन पाहूनच फिटनेस येतो - मुख्यमंत्री मुंबई मॅरेथॉनचे वातावरण व त्याच्या उत्सवाचे स्वरूप पाहूनच आपणास आपोआप फिटनेस येतो, असे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे माध्यमाशी बोलताना काढले. त्यांच्या हस्ते मुंबई मॅरेथॉनच्या 'ड्रीम रन' ला 'फ्लॅग ऑफ' ने सुरुवात झाली. यावेळी मुख्यमंत्री महोदयांच्या पत्नी अमृता फडणवीस, क्रीडा व युवक कल्याण मंत्री विनोद तावडे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, आमदार आशिष शेलार, आमदार राज पुरोहित, मुंबईचे पोलीस आयुक्त सुबोध कुमार जयस्वाल, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा आदी उपस्थित होते.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom