मानखुर्द येथे विधवा महिलेवर सामूहिक बलात्कार

Anonymous

मुंबई - मानखुर्द येथे एका विधवा महिलेवर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना गुरुवारी रात्री ११च्या सुमारास घडली आहे. महिलेने प्रतिकार करण्याच भरपूर प्रयत्न केला. परंतु, नराधमांनी तिला मारहाण करत तिच्यावर बलात्कार करुन रस्त्यावर सोडून पळ काढला. 

मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री विधवा महिला घरी जात असताना मानखुर्द मंडाला येथील साठे नगर परिसरातील सर्व्हिस रोडवर चार नराधमांनी अडवले. या रस्त्यावर जास्त रात्रीच्या वेळी जास्त वर्दळ नसते. त्यामुळे नराधमांनी महिलेला अडवत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. महिलेने विरोध केला असता तिला मारहाण देखील केली आणि बलात्कार करुन रस्त्यावर सोडून दिले. त्यानंतर चारही नराधम फरार झाले. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. तर दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
Tags