रबर उद्योगामुळे भारताच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होणार - सुरेश प्रभू

Anonymous

मुंबई दि ,१७ (प्रतिनिधी) - वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभु यांनी आज मुंबईत इंडिया रबर एक्सपो - 2019 च्या 10 व्या आवृत्तीचे उद्घाटन केले. या प्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की रबर उद्योग वेगाने वाढेल, रोजगाराच्या संधी वाढवेल, निर्यातीमध्ये वाढ होईल आणि भारताच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. याप्रसंगी आय आर इ चे चेअरमन विक्रम मकर, आय आर ई चे प्रमुख विष्णू भीमराजका आदी मान्यवर उपस्थित होते. 

प्रभु यांनी सांगितले की, सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेची वाढ आणि सूक्ष्म पातळीवर व्यवसायात सहजतेने सुधारणा करण्यासाठी व्यापक तंत्रज्ञानावर कार्यरत आहे. त्यांनी सांगितले की सरकार भारताच्या निर्यातीत वाढ करण्यासाठी सरकार काम करीत आहे आणि गेल्या 13-14 महिन्यांमध्ये भारतच्या निर्यातीमध्ये जवळपास 10% वाढ झाली आहे. इंडिया रबर एक्सपो हे आशियातील सर्वात मोठे रबर एक्सपो आहे. भारतीय कंपन्यांना परदेशी कंपन्यांना भेटायला आणि सहयोग करण्यासाठी एक अद्वितीय संधी येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.