विजय मल्ल्या फरार घोषित


मुंबई - अनेक बँकांचे सुमारे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवून भारताबाहेर पळून गेलेला उद्योगपती विजय मल्ल्याला अखेर फरार घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे त्याची संपत्ती जप्त करण्याचा सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) मार्ग मोकळा झाला आहे. शिवाय नव्या कायद्यांतर्गत फरार घोषित करण्यात आलेला मल्ल्या हा पहिलाच उद्योगपती ठरला आहे.

नव्या परागंदा आर्थिक गुन्हेगार कायद्यांतर्गत विजय मल्ल्याला ‘परागंदा आर्थिक गुन्हेगार’ घोषित करण्याची विनंती ईडीने एका अर्जाद्वारे विशेष पीएमएलए न्यायालयाला केली होती. त्यावरील सुनावणीअंती विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश एम. एस. आझमी यांनी निर्णय राखून ठेवला होता. त्यावर आज निर्णय देताना कोर्टाने मल्ल्याला फरार घोषित केले आहे.
Tags