बेस्ट बसच्या धडकेत वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

JPN NEWS

मुंबई - बेस्ट बसची धडक लागून एका पादचारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना अंधेरी येथे घडली. कांचनबेन सौजीभाई मिस्त्री असे या महिलेचे नाव असून ती 81 वर्षांची आहे. या अपघाताप्रकरणी बेस्ट बस चालक बबन थोरात याला अटक करून जामिनावर सोडून देण्यात आले आहे. 

कांचनबेन ही वयोवृद्ध महिला अंधेरीतील एस. एम. मार्गावरील संगीना मेन्शन इमारतीमध्ये राहते. त्या नेहमी सकाळी नऊ वाजता घरापासून काही अंतरावर असलेल्या गणपती मंदिरात पूजेसाठी येत होत्या. शनिवारी सकाळी त्या नेहमीप्रमाणे मंदिरात पूजेसाठी आल्या होत्या. पूजा संपल्यानंतर सकाळी अकरा वाजता त्या घरी जाण्यासाठी निघाल्या. यावेळी तेथून जाणार्‍या एका बेस्ट बसची धडक लागून त्या गंभीररीत्या जखमी झाल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच अंधेरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. कांचनबेन यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.
Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !