५ वर्षात पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या एक लाखाने घटली


मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या गेल्या पाच वर्षात एक लाखाने घटली आहे. अशी माहिती प्रजा फाउंडेशनने प्रसिद्ध केलेल्या अहवालात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

प्रजा फाउंडेशनने मुंबई मराठी पत्रकार संघात प्रसिद्ध करण्यात आला. पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या अशीच राहिली तर २०२७ - २८ मध्ये पालिकेच्या शाळांमध्ये एकही विद्यार्थी राहणार नाही असे म्हटले आहे. २०१७ - १८ मध्ये पालिकेच्या ४२६ शाळांमध्ये १०० हुन कमी विद्यार्थी आहेत. गेल्या दहा वर्षात विद्यार्थी नसल्याने किंवा विद्यार्थी कमी असल्याने २२९ शाळा बंद पडल्या आहेत. ज्यामध्ये ४८ टक्के शाळा मराठी माध्यमाच्या आहेत, तर ३९ टक्के शाळा गुजराती, तमिळ, तेलगू आणि कन्नड माध्यमांच्या असल्याचे म्हटले आहे. पालिका शाळांमध्ये शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये पालक, शिक्षक आणि स्थानिक नगरसेवकांचा समावेश आहे. मात्र नगरसेवक या समितीच्या बैठकांना अनुपस्थित राहत असल्याने शाळांचे अनेक प्रश्न सुटू शकत नसल्याचे अहवालात म्हटले आहे.
Tags