चंदा कोचर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

Anonymous

नवी दिल्ली - सीबीआयने आयसीआयसीआय बँकेच्या पूर्व कार्यकारी संचालक आणि सीईओ चंदा कोचर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चंदा कोचर यांच्यासह त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडीओकॉनचे कार्यकारी संचालक विएन धूत यांच्या विरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंदा कोचर यांनी नियमबाह्य पद्धतीने व्हिडीओकॉन कंपनीला तब्बल ३२५० कोटींचे कर्ज दिले होते. मात्र, व्हिडीओकॉन कंपनीने ते कर्ज बुडविले आणि त्यानंतर चंदा कोचर यांच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण झाला. चंदा कोचर यांनी व्हिडीओकॉनला हे कर्ज देताना त्यांच्या वैयक्तिक हिताचा विचार केला आणि स्वतःचा फायदा करून घेतला असा आरोप त्यांच्यावर आहे. जूनपासून चंदा कोचर या सक्तीच्या रजेवर होत्या. चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या न्यू-पॉवर या कंपनीला व्हिडीओकॉनकडून दोन कोटी रूपये देण्यात आले होते अशी माहिती देखील समोर आली. त्यानंतर हे प्रकरण आणखी गंभीर असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, यानंतर आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये जवळपास १ % टक्क्याने घट झाली आहे.