केईएम रुग्णालयात काम बंद आंदोलन


मुंबई - केईएम रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये मोबाईल चार्जिंग लावण्यास मनाई केल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली. सलग दुसऱ्यादिवशी कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याने कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले.   

मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी ११.३० च्या सुमारास घडली आहे. वॉर्डमध्ये मोबाईल चार्जिंग लावण्यास मनाई केल्याने एका रुग्णाच्या नातेवाईकाने कर्मचाऱ्याला मारहाण केली. गुरुवारी सायंकाळी केईएम रुग्णालयामधील कर्मचारी विजय शंकर नाटेकर ड्युटी संपल्यावर नातेवाईकाला घेऊन आपातकालीन विभागात जात होते. त्यावेळी महाराष्ट्र सुरक्षा बल जवानाकडून त्यांना विचारणा केली. पण, आपण कर्मचारी असल्याचे नाटेकर यांनी सांगितले. त्यावरुन नाटेकर आणि जवान यांच्यात बाचाबाची होत धक्काबुक्की झाल्याचे समोर आले आहे. 

सलग दुसऱ्या दिवशी केईएम रुग्णालयामधील कर्मचार्‍याला धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडल्याने सुरक्षाजवानांकडून झालेल्या धक्काबुक्की आणि रुग्णांच्या नातेवाईकांकडून होणाऱ्या मारहाणीच्या निषेधार्थ शुक्रवारी कर्मचार्‍यांनी संप पुकारला. मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक करेपर्यंत काम बंद ठेवण्याची भूमिका या कर्मचारी संघटनांनी घेतली होती. कामगारांनी काम बंद आंदोलन केले आहे. कर्मचार्‍यांनी रुग्णालयाच्या डीन कार्यालयाबाहेर आंदोलन केले. मारहाण करणार्‍या आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत काम बंद ठेवण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला. 

या घटनेनंतर अधिष्ठातांसह बैठक झाली. अधिष्ठातांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करत असल्याचं आणि कर्मचाऱ्याच्या कॉलरला धरुन जाब विचारत असल्याचं पाहिलं. संबंधित सात जणांविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच दोषींना कामावरुन काढण्याची मागणी कर्मचारी संघटनांकडून करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणावर ४ दिवसांत निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी युनियनकडून करण्यात आली आहे.
Tags