राज्य पोलीस दलातील 44 अधिकारी, कर्मचार्‍यांना राष्ट्रपती पदक


मुंबई - प्रजाकसत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य पोलीस दलातील 44 पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. त्यात चार राष्ट्रपती पोलीस पदक आणि चाळीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपदी पदक जाहीर झाले आहे.

मुंबई शहरातील पोलीस उपायुक्त शहाजी उमाप, सहाय्यक पोलीस आयुक्त दिनेश जोशी, शरद नाईक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन अलकनुरे, पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे, सचिन कदम, धनश्री करमारकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल परब या पोलीस अधिकार्‍यांचा यामध्ये समावेश आहे. राष्ट्रपती पोलीस पदकांमध्ये लालुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग, नवी मुंबई राज्य राखीव दलाचे सहाय्यक समादेशक भास्कर महाडिक, खेरवाडी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त दिनेश जोशी, रत्नागिरी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विष्णू नागले यांचा समावेश आहे.

उत्कृष्ट सेवा पोलीस पदकामध्ये (पुणे विभाग) गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन डी. पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक शंकर भोसले, विशेष शाखेचे लक्ष्मण कृष्णा थोरात, स्वारगेट पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बाळकृष्ण कुलकर्णी (पिंपरी-चिंचवड-पुणे ग्रामीण एसआरपीएफ), सहाय्यक पोलीस आयुक्त गणपतराव माडगुळकर, भीगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय तुळशीराम चौधरी, पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळाचे पोलीस निरीक्षक अरविंद टी गोकुळे, एसआरपीएफचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीधर काशिनाथ देसाई, झोन पाचचे पोलीस उपायुक्त पोलीस उपायुक्त शहाजी उमाप, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सतीश बी. माने, सहाय्यक पोलीस आयुक्त शरद नाईक, राज्य राखीव दलाचे दौंड, नानवीज पोलीस निरीक्षक गणपत एच तरंगे, शिल्दाईघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश व्ही. सावंत, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन अलकनुरे, नवी मुंबई गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन एस. राणे, नागपूर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय व्ही. पुरंदरे, खार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार एम. गोपाळे, खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सचिन कदम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर राजाराम शेलार, हेड कॉन्सटेबल कृष्णा हरिबा जाधव, राज्य पोलीस मुख्यालयातील पोलीस निरीक्षक धनश्री करमारकर, राज्य गुप्तवार्ता विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मारुती परब, पालघर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अर्जुन ज्ञानदेव शिंदे, राज्य गुप्तवार्ता विभागाचे पोलीस उपनिरीक्षक सत्यवान महादेव राऊत, भद्रकाली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास रघुनाथ मोहिते, रायगड पोलीस मुख्यालयाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजकुमार नथूजी वरुडकर, सातारा गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम बाळकृष्ण देशपांडे, औरंगाबाद एमटी विभागचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग किशरलाल चौधरी, कोल्हापूर एसीबीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर बसप्पा खानगावकर, नाशिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जाकीर हुसेन गुलाम हुसैन शेख, वरळी एसीबीचे हेड कॉन्स्टेबल गणपती यशवंत डफाळे, ना. म जोशी मार्ग पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल पांडुरंग राजाराम तळवडेकर, मालाड पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल अर्जुन महादेव कदम, गुन्हे शाखेचे हेड कॉन्स्टेबल दयाराम तुकाराम मोहिते, दत्तात्रय पांडुरंग कुढाळे, सीआयडी विशेष शाखेचे हेड कॉन्स्टेबल भानुदास यशवंत मानवे आणि अकोला एमटी विभागाचे हेड कॉन्स्टेबल विनोद प्रल्हादराव ठाकरे यांचा समावेश आहे.