Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

सपा-बसपाची युती


लखनऊ – आगामी लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीने सर्व मतभेद बाजुला ठेवून 25 वर्षांनंतर ऐतिहासिक युतीची घोषणा आज केली. बसपाच्या अध्यक्षा मायावती आणि सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आज एका संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा केली. युतीच्या घोषणेसोबतच जागावाटपही जाहीर करण्यात आले. उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या 80 जागांपैकी सपा-बसपा प्रत्येकी 38-38 जागा लढवणार आहे. या युतीत कॉंग्रेसला सहभागी करून घेतले नसले तरी कॉंग्रेसचे पारंपरिक मतदारसंघ अमेठी आणि रायबरेली या दोन ठिकाणी सपा-बसपा आपला उमेदवार उभा करणार नाही, असे मायावती म्हणाल्या.

25 वर्षानंतर सपा-बसपाची ऐतिहासिक युती झाली आहे. 1995 साली घडलेल्या गेस्ट हाउस कांडची आठवण करीत ही युती केवळ लोकांच्या भल्यासाठी झाली असल्याचे मायावती म्हणाल्या. लोहियाजींच्या मार्गावर चालणार्‍या समाजवादी पार्टीसोबत सर्वात आधी 1993 साली बसपाचे संस्थापक कांशीराम आणि सपा नेते मुलायम सिंह यादव यांनी युती करून निवडणूक लढवली होती. जातीयवादी भाजपचा पराभव करून उत्तर प्रदेशात सपा-बसपाने सरकार बनवले होते.

आज पुन्हा एकदा लखनऊ गेस्ट हाउस कांड विसरून जनहितासाठी आणि भाजपचा पराभव करण्यासाठी बसपाने युतीचा निर्णय घेतला आहे, असे मायावती म्हणाल्या. सपा-बसपाची संयुक्त पत्रकार परिषद ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा या गुरू-चेल्यांची झोप उडवणारी आहे, असा टोलाही मायावती यांनी यावेळी लगावला.

2019 हे वर्ष राजकीयदृष्ट्या क्रांतिकारी वर्ष ठरणार आहे. या युतीमुळे जनतेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ही केवळ दोन पक्षांची युती नसून सामाजिक परिवर्तनाचे लक्ष्य गाठण्यासाठी सुरू केलेले आंदोलन आहे. सपा-बसपाची ही युती तात्पुरती नसून ती कायमस्वरूपी आहे.

2019 ची लोकसभा निवडणूक एकत्र लढल्यानंतर 2022 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकाही सपा-बसपा एकत्र लढवणार असल्याची घोषणाही मायावती यांनी केली. सपा-बसपाची युती जाहीर झाल्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत आनंद साजरा केला. 

आगामी पंतप्रधान उत्तर प्रदेशातून – अखिलेशउत्तर प्रदेशाने देशाला सर्वात जास्त पंतप्रधान दिले आहेत. यावेळीही उत्तर प्रदेशातून देशाला पंतप्रधान मिळावा, असे मला वाटतेय, असे अखिलेश यादव म्हणाले. मायावतींना पंतप्रधान करणार का? या प्रश्नावर उत्तर देताना ते बोलत होते. मायावती यांच्याविरोधात भाजप नेत्यांनी असभ्य भाषेचा वापर केला. तरीही त्या नेत्यांविरोधात भाजपने कोणतीही कारवाई केली नाही. मायावती यांचा अपमान हा माझा अपमान आहे, असेही अखिलेश यादव म्हणाले. देशात सध्या असहिष्णुतेचे वातावरण आहे. भाजपने धर्माच्या नावावर राजकारण सुरू केले आहे. उत्तर प्रदेशात बेरोजगारी वाढली आहे. भाजपच्या राज्यात सर्व वर्गातील लोक चिंताग्रस्त आहेत, असेही अखिलेश यादव म्हणाले.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom