अपघातात मुंबईतील घाटकोपरमधील सहा जणांचा मृत्यू

JPN NEWS

मुंबई – पंढरपूर-सोलापूर रोडवर आज सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास मुंबईतील घाटकोपर परिसरात राहणारे सुरेश कोकणे हे आपल्या कुटुंबासह पंढरपूर येथे दर्शनाला जात असताना त्यांच्या मारुती इको कारने एसटी बसला दिलेल्या धडकेत सहा जणांचा मृत्यू झाला असून एक मुलगी गंभीर जखमी आहे. सुरेश कोकणे कुटुंब आज अक्कलकोट येथून पंढरपूरकडे दर्शनाला जात असताना पंढरपूरजवळील ईश्वरवठार परिसरात हा भीषण अपघात झाला. या अपघातात सुरेश रामचंद्र कोकणे (68), सचिन सुरेश कोकणे (40), सविता सचिन कोकणे (34), आर्यन सचिन कोकणे (12), श्रद्धा राजेश सावंत (20), प्रथम राजेश सावंत (16) अशी मृतांची नावे आहेत. धनश्री राजेश सावंत (19) ही गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. अपघात इतका भीषण होता की कारच्या समोरच्या भागाचा चुराडा झाला होता. मुंबईतील घाटकोपर परिसरात राहणारे सुरेश कोकणे हे आपल्या कुटुंबासह पंढरपूर येथे दर्शनाला जात असताना त्यांच्या एम-एच-03-ए-झेड-3116 या मारुती इको कारने राज्य परिवहन महामंडळाच्या इस्लामपूर-अक्कलकोट या सोलापूरकडे निघालेल्या एसटी बसला जोरदार धडक दिली. त्यात सहा जणांचा मृत्यू झाला तर एक मुलगी गंभीर जखमी आहे. सुरेश कोकणे कुटुंब अक्कलकोट येथील देवदर्शन आटोपून पंढरपूरकडे दर्शनाला जात असताना हा भीषण अपघात झाला. 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !