
पहिल्या टप्प्यातील नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत184 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल झाली होती. छाननीअंती लोकसभा मतदारसंघनिहाय वैध ठरलेल्या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे :
वर्धा लोकसभा मतदारसंघात 16, रामटेक मतदारसंघात 21, नागपूर मतदारसंघात 33, भंडारा-गोंदिया मतदारसंघात 23, गडचिरोली-चिमूर मतदारसंघात 6, चंद्रपूर मतदारसंघात 17 आणि यवतमाळ- वाशिम मतदारसंघात31 उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध ठरली. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची मुदत उद्या दि. 28 मार्च 2019 रोजी दुपारी 3वाजेपर्यंत असून त्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.