
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यात बीए आणि बीकॉम या परीक्षांचा समावेश आहे. तसेच औरंगाबादमधील डॉ. बाबासहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे १८ आणि १९ एप्रिलचे पेपर पुढे ढकलले आहे
मुंबई विद्यापीठाच्या बीए आणि बीकॉम अभ्यासक्रमाच्या २२ एप्रिल, २३ एप्रिल आणि २४ एप्रिल, त्यासोबतच २९ एप्रिल आणि ३० एप्रिल यादिवशी येणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. यासंदर्भात विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने याबदद्ल माहिती दिली आहे. २३ एप्रिल रोजी रायगड आणि सिंधुदुर्ग तर २९ एप्रिल रोजी मुंबई, उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात मतदान होणार आहे. या दिवशी असलेल्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षेचे बदलेले वेळापत्रक लवकरच मुंबई विद्यापीठाच्या वेबसाईवर अपलोड करण्यात येणार असल्याचे परीक्षा विभागाकडून सांगण्यात आले आहे.