प्रियांका गांधी यांनी घेतली अॅड चंद्रशेखर आझाद यांची भेट

Anonymous

काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी भीम आर्मी संस्थापक भाई अॅड चंद्रशेखर आझाद यांची घेतली भेट. मेरठ रूग्णालयात दाखल करण्यात आलेले अॅड चंद्रशेखर आझाद यांची भेट घेऊन आजाद हे देशातील तरूण पिढीचे नेतृत्व असल्याचे उद्गार प्रियांका यांनी काढले.यावेळी सिने अभिनेता राज बब्बर हे देखील त्यांच्या सोबत होते.

भीम आर्मीने 15 मार्च रोजी दिल्ली जंतरमंतर येथे देशव्यापी बहुजन हुंकार रॅलीचे आयोजन केले आहे.या रॅलीसाठी काढण्यात आलेल्या मोटारसायकल रॅलीला परवानगी असतानाही सहारनपूर जिल्हा देवबंद पोलीसांनी आचारसंहितेचे कारण सांगून परवानगी रद्द केल्याचे सांगत अॅड आझाद यांना अटक केली.यावेळी झालेल्या झटापटीत अॅड आझाद यांना त्रास झाल्याने त्यांना कालपासून मेरठ हेल्थ केअर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर प्रियांका गांधी यांनी त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली.