Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा भाजपात प्रवेश


मुंबई - पश्‍चिम महाराष्ट्रातील सोलापूरच्या मोहिते-पाटील या दिग्गज राजकीय घराण्यातील राष्ट्रवादीचे खासदार आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे. मुंबईत वानखेडे स्टेडियममधील गरवारे जिमखान्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली.

रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे वडिल विजयसिंह मोहिते-पाटील यांनी रणजितसिंह पाटलांच्या भाजपात जाण्याच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले. काल अकलूजच्या शिवरत्न बंगल्याच्या हिरवळीवर सोलापूर जिल्ह्यातील मोहिते-पाटील समर्थकांची बैठक झाली. खा. विजयसिंह मोहिते पाटील व त्यांचे चिरंजीव माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सातत्याने डावलले जात असल्याची भावना कार्यकर्ते बोलून दाखवत होते. रणजितसिंह यांचा भाजपात जाण्याचा निर्णय बैठकीपूर्वीच झाला होता. या बैठकीत हजारो कार्यकर्ते भाजपमध्ये चला चा एकच नारा देत होते.

राष्ट्रवादी काँग्रेस ची स्थापना 10 जून 1999 रोजी झाली त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील विजयसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांची बैठक याच अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर 13 जून 1999 रोजी घेतली होती व निर्णय घेऊन एकमुखाने सोलापूर जिल्ह्यातील सारी शक्ती शरद पवार यांच्या मागे ठामपणे उभी केली होती, मात्र विजयसिंह मोहितेपाटलांना विरोध करणार्‍या काही कार्यकर्त्यांना अजित पवार यांनी कायम रसद पुरवली होती, त्याचे पर्यावसान भाजपा प्रवेशात झाले.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom