नवी दिल्ली (२१ मार्च) - सत्ताधारी भाजपने आज पहिल्या उमेदवार यादीला जाहीर झाली आहे. या यादीत १८२ उमेदवारांचा समावेश असून त्यात महाराष्ट्रातील १६ उमेदवार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा वाराणसीमधून लोकसभा निवडणूक लढविणार आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांना देखील भाजपने त्यांच्या इच्छित मतदारसंघातून म्हणजेच अहमदनगरमधून उमेदवारी दिली आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमधून उमेदवारी दिली आहे.
महाराष्ट्रातील भाजप उमेदवारांची नावेउमेदवारांची नावे मतदारसंघ
डॉ.सुजय विखे पाटील अहमदनगर
नितीन गडकरी नागपूर
रानवसाहेब दानवे पाटील जालना
रक्षा खडसे रावेर
संजय पाटील सांगली
कपिल पाटील भिवंडी
हिना गावित नंदूरबार
सुभाष भांमरे धुळे
संजय धोत्रे अकोला
रामदास तडस वर्धा
अशोक नते गडचिरोली
हंसराज अहिर चंद्रपूर
गोपाल शेट्टी उत्तर मुंबई
पूनम महाजन उत्तर मध्य मुंबई
प्रीतम मुंडे बीड
सुधाकरराव शिंगारे लातूर