वरळी समुद्रात बोट बुडाली, १ जण बेपत्ता

Anonymous
मुंबई - मुंबईतील वरळी समुद्रात रेवती नावाची बोट बुडाल्याची माहिती समोर येत आहेत. या अपघातात ६ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून एकजण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, घटनास्थळी तटरक्षक दलाच्या जवानांनी ६ जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आले आहे. हेलिकॉप्टर आणि बोटीच्या साहाय्याने बेपत्ता असलेल्या एका व्यक्तीचा शोध तटरक्षक दलाच्या जवानांकडून केला जात आहे.
Tags