काँग्रेसचे महाराष्ट्रातील ५ उमेदवार जाहीर

Anonymous

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुका देशभरात सात तर महाराष्ट्र्रात चार टप्प्यात संपन्न होणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपले उमेदवार जाहीर करण्यास राजकीय पक्षांनी सुरुवात केली आहे. काँग्रेसकडून आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून त्यात महाराष्ट्रातील ५ उमेदवारांचा समावेश आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्रातून सुशीलकुमार शिंदे, नाना पटोले, प्रिया दत्त, मिलिंद देवरा, डॉ. नामदेव उसेंदी या ५ जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या या दुसऱ्या यादीत एकूण २१ उमेदवारांची नावे आहेत. त्यापैकी ५ उमेदवार हे महाराष्ट्रातील असून अन्य १६ उमेदवार उत्तर प्रदेशातील आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीकडून देखील लवकरच उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

उमेदवारांची नावे       मतदारसंघ
नाना पटोले                   नागपूर
डॉ. नामदेव उसेंदी        गडचिरोली
सुशीलकुमार शिंदे        सोलापूर
प्रिया दत्त                      उत्तर मध्य मुंबई
मिलिंद देवरा                दक्षिण मुंबई