सीएसएमटी पूल दुर्घटना - स्ट्रक्चरल ऑडिटरच्या पोलीस कोठडीत १० एप्रिलपर्यंत वाढ - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

28 March 2019

सीएसएमटी पूल दुर्घटना - स्ट्रक्चरल ऑडिटरच्या पोलीस कोठडीत १० एप्रिलपर्यंत वाढ


मुंबई - सीएसएमटी स्टेशनजवळील हिमालय पूल दुर्घटना प्रकरणात ऑडिटर नितीन देसाई यांच्या न्यायालयीन कोठडीत १० एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नीरजकुमार देसाई सोमवारी (१८ मार्च) स्ट्रक्‍चरल ऑडिटरला सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. या प्रकरणात देसाई यांना विशेष न्यायालयाने २५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ही पूल दुर्घटना शुक्रवारी (१५ मार्च) घडली होती. यात सहा जणांचा मृत्यू झाला असून ३९ जण जखमी झाले होते.

या प्रकरणात पुलाची दुरूस्ती करणाऱ्या आरपीएस कंत्राटदाराला शनिवारी (१६ मार्च) कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आले होते. या नोटीसला उत्तर देण्यासाठी १५ दिवसाचा कालावधी देण्यात आला होता. हिमालय पुलाची २०१३ मध्ये या पुलाची दुरूस्ती आरपीएस या कंत्राटदाराने केली होती. २०१७-१८ यादरम्यान या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. या ऑडिटमध्ये पुल धोकादायक नससल्याचे सांगत किरकोळ दुरूस्तीची असल्याचे देसाई याने सांगितले होते.

Post Top Ad

test