मानखुर्द येथे विजप्रवाह सुरु असलेली वायर पडल्याने ६ जखमी

JPN NEWS

मुंबई - मानखुर्द एकता नगर येथील घरावर टाटा पॅावरची भारी विद्युत प्रवाह असलेली वायर पडून घराच्या भिंतीचा भाग कोसळला. या दुर्घटनेत सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना गोवंडी शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात असून जखमीपैकी एकाला उपचार करुन घरी सोडण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

एकतानगर, शिवनेरी रोड, भवानी मेडिकल स्टोअर जवळ मानखुर्द मंडाळा येथील एका घरावर टाटापावरची भारी विद्युत प्रवाह वाहून नेणारी वायर तुटून पडली. ही वायर हाय विद्युत व्होल्टेजची असल्याने घराची भिंत कोसळली. या घटनेत धीरज यादव (१४), अरबाज शेख (१४), प्रशांत दिलीप पवार (२५), निलेश यादव (१४), विपुल धनश्याम पाठक (३४) या सहा जणांना शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून विपुल पाठक यांना उपचारानंतर घरी सोडवण्यात आले आहे. तर उर्वरित पाच जणांवर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
Tags