Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

शरद पवारांमुळे दाऊदच्या भारत वापसीची संधी हुकली

मुंबई - दाऊद इब्राहिम भारताकडे सरेंड करण्यास तयार होता, मात्र शरद पवार यांच्यामुळे ही संधी हुकली, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. दाऊदसाठी आता भीक मागितली जाते आहे, मात्र शरद पवार यांनी ती संधी गमावली, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. आंबेडकर भवन येथील पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला. याबाबत शरद पवार यांनी खुलासा करावा, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.

1993 च्या मुंबईत बॉम्बस्फोट आणि दंगलीचा मास्टरमाइंड असल्याचा संशयित आरोपी दाऊद भारताला द्या, अशी भीक मागणार्‍यांनी यापूर्वी आलेली संधी गमावलेली आहे. यापूर्वी ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी दाऊद समर्पण करायला तयार आहे आणि तो न्यायालयीन प्रक्रियेतदेखील सहभागी होऊ इच्छितो, असा प्रस्ताव राष्ट्रवादीचे अध्यक्ष व तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना दिला होता, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लंडनमध्ये दाऊद इब्राहिम आणि राम जेठमलानी यांची भेट झाली होती. त्या वेळी त्याने आपण आत्मसमर्पण करण्यास तसेच न्यायालयीन प्रक्रियेत सहभागी होण्यास तयार असल्याचा प्रस्ताव दिला होता. मला जेलमध्ये ठेवले तरी चालेल, असे त्याचे म्हणणे होते. त्याची मागणी होती की थर्ड डिग्री वापरली जाऊ नये. राम जेठमलानी यांनी ही माहिती शरद पवारांकडे दिली होती, परंतु शरद पवार यांनी या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केले, असा आरोप आंबेडकर यांनी केला आहे. तसेेच या निर्णयात यूपीए सरकारसुद्धा सहभागी आहे, असेही आंबेडकर यांनी सांगितले.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom